अल्पावधीतच स्वराज्य पत्रकार संघ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला -- दिपक पवार
पत्रकार बांधवांना नियुक्तीपत्रक वाटप
किरण वाघ /मुन्ना ठाकूर
देऊळगाव राजा --
कोणतेही लोक एकत्र आले आणि संघटना बनवली असे होत नाही आणि झाले तरी ही संघटना फार टिकत नाही.एक चांगली आदर्श संघटना तयार करण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचे विचार सारखे असायला हवे. सगळ्यांचे विचार एक होईल , ध्येय एक होईल तेव्हाच ती एक चांगली संघटना होते आणि जो व्यक्ती संघटनेचे नेतृत्व करणार आहे किंवा संघटनेचा पुढारी आहे तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा सगळ्यांचे ऐकून घेणारा सगळ्यांच्या विचारावर विचार करणारा असला पाहिजे. आपल्या संघटनेचे ध्येय कोणते आहे हे प्रत्येक सदस्याला माहीत असले पाहिजे आणि त्या बाबतीची जाणीव असली पाहिजे या सर्व बाबींचा विचार करूनच स्वराज्य पत्रकार संघ प्रत्यक्षात कृती करत आहे आणि अतिशय अल्पावधीतच पत्रकार संघाचे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून या संघटनेचे सचिव व मेहकर टाईम वृत्तपत्राचे वृत्त संपादक उद्धव फंगाळ , संस्थापक अध्यक्ष निलेश नहाटा मुख्य संपादक अरुण भाई , उपाध्यक्षअंकुश राठोड, जिल्हा अध्यक्ष गजानन गोरोळे या सर्वांच्या नेतृत्वात अतिशय अल्पावधीतच स्वराज्य पत्रकार संघ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल व मजबुत संघटन उभे करू शकला असे गौरवोद्गार पिंपळगाव चिल्लम खा गावचे सरपंच दिपक पवार यांनी येथेल ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.या कार्यकमाचे अध्यक्ष परमेश्वर खांडेभराड उपसरपंच हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच दिपक पवार, वृत्त संपादक उद्धव फंगाळ, जिल्हा अध्यक्ष गजानन गोरोळे, आवृत्ती संपादक कैलास राऊत, उपसंपादक समाधान देशमुख, विशेष प्रतिनिधी संदिप ढोरे, अंकुश चव्हाण, रंजित खिल्लारे ,राजाराम खांडेभराड आमआदमी पार्टी,भानुदास खांडेभराड तंटामुक्ती अध्यक्ष, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमात समाधान देशमुख विदर्भ उपाध्यक्ष,किरण वाघ जि.संघटक,मुन्ना ठाकूर दे.राजा विशेष प्रतिनिधी यांची स्वराज्य पत्रकार संघाच्या ता. अध्यक्षपदी , सुरज हनुमंते दे. राजा शहराध्यक्ष ,गजानन कायंदे ता.उपाध्यक्ष ,दिलीप वनवे ता.सचिव ,देवानंद झोटे ता. उपाध्यक्ष ,समाधान डोईफोडे शहर सचिव, इत्यादी पदाधिकाऱ्यांची स्वराज्य पत्रकार संघटनेच्या विविध पदावर निवड करण्यात आली त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते वरील सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाला रंजित खिल्लारे, समाधान देशमुख ,गजानन गारोळे ,कैलास राऊत, दिपक पवार ,भानुदास खांडेभराड इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील अर्जुन पाटोळे, ज्ञानेश्वर पवार, प्रदिप दळेकर,आसाराम कांबळे , शिवाजी पवार,शांरधर तेळेकर, इत्यादी गावकर्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहकर टाईम ची आवृत्ती संपादक कैलास राऊत त व आभार प्रदर्शन विशेष प्रतिनिधी संदीप ढोरे यांनी केले,_