धस यांचा विकास कामाचा धडाका. - - नवीन सरकारच्या पहिल्याच आअधिवेशनात ७ रस्ते कामांना ४४ कोटी ५० लक्ष रू निधी मंजूर.



 - 

पाटोदा (प्रतिनिधी):- माजी राज्यमंत्री तथा उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे विद्यमान विधान परिषद सदस्य सुरेशरावजी धस यांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांचे सरकार स्थापित होताच पहिल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये आष्टी आणि पाटोदा तालुक्यामधील रस्ते  बांधकामासाठी ४४ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर होऊन नुकतेच सुरू झालेल्या पहिल्याच अधिवेशना मध्ये आमदार सुरेशरावजी धस यांनी आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीप्रमाणे रस्ते कामांना निधी मंजूर करून घेतला आहे. या मध्ये आष्टी तालुक्यातील १)आष्टी ते खडकत... १५.०० कोटी रुपये, २) देसुर ते बीडसांगवी... ५.०० कोटी रुपये, ३) वाळुंज ते खडकत... ८.०० कोटी रुपये, ४) धानोरा ते लोणी... ५.०० कोटी रुपये, ५) आष्टा ते जामगाव...२.५० कोटी रुपये, ६) मराठवाडी ते केळ, पिंपळगाव घाट... ३.०० कोटी रुपये आणि पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते साकत... ६.०० कोटी रुपये अशा एकूण ७ रस्ते कामांसाठी एकूण ४४.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या रस्ते कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेशरावजी धस यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघातील असलेल्या या रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून ही गेल्या अडीच वर्षात कुठल्याही प्रकारचा निधी या रस्त्यांच्या कामासाठी मिळाला नव्हता आता या रस्त्यांची अवस्था बदलणार असल्याने या भागातील जनता समाधान व्यक्त करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler