महालगाव बू येथे आदिवासी जनजागृती कार्यक्रम पार पडला....
चंद्रपूर जिल्हा संपादक
राकेश भूतकर....
8308264808
शेगाव बू येथून जवळच असलेल्या महालगाव बू येथे दिनांक ४/१०/२०२२ रोज बुधवारला आदिवासी जनजागृती कार्यक्रम निमित्ताने गावातील नागरिकांना महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.याच प्रमाणे अंधश्रद्धा जनजागृती व सायबर गुन्ह्या बाबत माहिती दिली. तसेच मुले पळवणारी टोळी आली आहे ही अफवा आहे त्यावर विश्वास ठेऊन तुमच्या हातातून कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू देऊ नका. व संशयित व्यक्ती गावात आढळल्यास पोलीस स्टेशनला माहिती द्या. तसेच आम्ही पोलीस स्टेशन ला सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका ची माहिती देऊन गावातील विद्यार्थी यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गावातील पोलिस पाटील सौ. मंजुषा वांढरे यांनी गावातील चारही दुर्गा देवी महिला मंडळ यांना भेट वस्तू देण्यात आल्या....