*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख यांना बसस्थानका मधील स्वच्छता ग्रहांची दुरुस्ती व महिला स्वच्छताला ग्रहाला दरवाजा बसवण्याची मागणी अन्यथा 1 एप्रिल 2021 रोजी आगार प्रमुख कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा* महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले आहे की कित्येक वर्षांपासून मोजे किनगाव येथील बसस्थानक दुरावस्था झाली आहे मधील स्वच्छता ग्रह पडण्याच्या मार्गावर आहे सर्वत्र दुर्गंध पसरला आहे, व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे महिला स्वच्छता ग्रहाला दरवाजा नाही त्याबाबत निवेदन देण्यात आले, स्वच्छता ग्रह मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे कधी पडेल सांगता येत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,बस स्थानका मधील फँन मोडक्या अवस्थेत आहेत, स्वच्छता ग्रहांची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे, किनगाव येथुन ये जा करणा-या शंभर पेक्षाही जास्त गाड्या आहेत, मोठ्या प्रमाणात प्रवासी येथुन प्रवास करतात, मुक्कामी काळात बस चालकाला व वाहकांना बसस्थानकात थांबावे लागते त्यांना मच्छराचा व दुर्गंधीचा सामना करावा लागतो, वारंवार मागणी करूनही महामंडळ लक्ष देत नाही . तात्काळ स्वच्छता ग्रहांची दुरुस्ती करावी आणि महिला स्वच्छतागृहांस दरवाजा बसवला नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आगार प्रमुख अहमदपूर येथे 1/4/2021 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले , प्रहार सेवक वैजनाथ सुनेवाड, दिनेश किनकर,अनवर तांबोळी, वैजनाथ चाकाटे, बालाजी पांचाळ,इम्रान पठाण, बबलू कुरेशी,भिमा भंडारे, गणेश बोडके,अक्षय क्षिरसागर, गडकरी हनुमंत,सावता श्रृंगारे,ओम शेळके, सतिश पांचाळ, सुरेश सिध्देश्वरे, सतिश ठाकुर, रुतिक हुडगे अदिजण उपस्थित होतl
