संपादक: ज्ञानेश्वर लाड
*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले तर्फे तहसिलदार कार्यालय अहमदपूर मार्फत मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांना घरगुती विज व शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युत कनेक्शन तोडणी चालु असलेली मोहीम थांबविणे बाबत निवेदन*
अहमदपूर येथे आज तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या नेतृत्वाखाली, जनतेची घरगुती विज बिलाची सक्तीची वसुली व शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युत कनेक्शन सरसकट तोडणी चालु असलेली मोहीम थांबविण्यासाठी तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले,चालु विज कनेक्शन न तोडता 1जुन 2021तारीख विज बील भरण्याची तारीख वाढुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पाण्यावाचुन लोकांचे व जणांवराचे बे हाल होत आहेत त्यात कोरोना माहामारीचे संकट आहे तरी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे तहसिलदार साहेब यांना असे निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले , प्रहार सेवक वैजनाथ सुनेवाड, दिनेश किनकर,अनवर तांबोळी, वैजनाथ चाकाटे, बालाजी पांचाळ,इम्रान पठाण, बबलू कुरेशी,भिमा भंडारे, गणेश बोडके,अक्षय क्षिरसागर, गडकरी हनुमंत,सावता श्रृंगारे,ओम शेळके, सतिश पांचाळ, सुरेश सिध्देश्वरे, सतिश ठाकुर, रुतिक हुडगे अदिजण उपस्थित होते