*पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती घराघरात साजरी करावी शिवअहिल्या शासन महाराष्ट्र राज्य संघटनेचे आवाहन..
प्रतिनिधी:- महाराष्ट्र न्यूज
सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे.कोरोना हा संसर्गजन्य आजार अजून सध्याच्या काळात रूग्नसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने घातलेल्या लाॅगडाऊन च्या नियमांचे पालन करून सर्व समाजबांधव तसेच अहिल्याभक्तांनी आपल्या कुटूंबासमवेत घरातच जयंती साजरी करावी. आपल्या घरात आराध्य दैवत अहिल्यादेवी यांच्या फोटोचे हार घालून, फुले,भंडारा वाहून तसेच दिपप्रज्वलन करून प्रतिमापूजन करावे. अहिल्याजयंती हा आपला सण आहे.या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो.या दिवशी घरात गोड स्वयंपाक करून हा सण साजरा करावा. शक्य असल्यास आपल्या घरावर आपली शान असलेला पिवळा ध्वज लावावा. आपण सर्वजण राजमातेच्या विचारांना मानतो त्यामुळे जयंती निमित्ताने शक्य होईल तेवढी आर्थिक मदत आपल्या परिसरातील गरीब कोरोना रूग्णांना करावी. तसेच कोरोना विषयी जनजागृती करून मेंढपाळ बांधवांना लसीचे महत्व पटवून द्यायचे आहे. असे आवाहन शिव अहिल्या शासन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक काटकर यांनी केले आहे.
