सिदंखेड राजा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा तर्फे ऑक्सिजन_कॉन्सनट्रेटर_बँक सुरू करण्यात आली..........
प्रतिनिधी:- सिंदखेडराजा
कोरोना मुळे गोरगरीब आणि गरजूंना मोफत ऑक्सिजन मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री आमदार_डॉ_संजयजी_कुटे यांच्या संकल्पेतून श्रीराम_कुटे_गुरुजी_चॅरिटेबल_ट्रस्ट जळगाव जामोद (बुलढाणा) अंतर्गत कुटे परिवाराने स्वखर्चातू जेन 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सिदंखेड राजा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा जिल्हा महामंत्री मा.डाँ.गणेशदादा मान्टे मा.विनोदभाऊ वाघ मा.डॉ. रामदासजी शिंदे मा.प्रा.गजानन घुले मा .विठोबा मुंढे मा.प्रल्हाद आण्णा लष्कर, मा.अँड.शिव ठाकरे मा.रोषन काबरा मेहकर मा .बाबाराव मुंढे लोणार भाजपा यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच सिंदखेडराजा/देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघासाठी 10 तसेच मेहकर विधानसभा मतदार संघासाठी 10ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सुपुर्द करण्यात आले
येत्या दहा दिवसात अजून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळणार असून गरजूंना मोफत देण्यात येणार आहे.
18 वयोगटाच्या आतील ज्या मुलांचे कोरोना मुळे पालकत्व हरवले आहे त्यांना श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक घेणार आणि त्यांचे शिक्षणा पासून संपूर्ण खर्च आमदार डॉ संजय श्रीराम कुटे करणार आहेत.
ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी डॉ .यांचे एक पत्र घेऊन स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
