मनसे युवा नेते अमीत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरमध्ये फळांचे वाटप
संपादक:-ज्ञानेश्वर लाड
सिंदखेडराजा:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमीतजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि.२४ मे रोजी सिंदखेडराजा येथिल कोविड सेंटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंदखेडराजा यांच्या वतिने अंडी व फळांचे वाटप करुन रुग्णांची विचारपुस करण्यात आले.
यावेळी मनविसेचे जिल्हा अध्यक्ष शिवादादा पुरंदरे, मनसे तालुका अध्यक्ष निलेश देवरे, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष अतिश राजे जाधव,तालुका उपाध्यक्ष अभी देशमुख, परिवहन सेना तालुका अध्यक्ष महेंद्र पवार, विजयराज भागिले,अंकुश चव्हाण, पवन राजे, शुभम पावरे आदि मनसे सैनिक उपस्थीत होते.