औषध विक्रेत्यांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे ,जिवन चेके यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे मागणी.

 औषध विक्रेत्यांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे

प्रतिनिधी:-सिंदखेड राजा


जिवन चेके यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे मागणी.

आज संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे 

एक महिन्या पासून राज्यात सगळीकडे लसीकरण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात जीवाची पर्वा न करता औषध विक्रेते २४ तास मेडिकल सुरू ठेऊन रुग्णांना औषधी पुरवत आहे. 


औषध विक्रेता म्हणजे फार्मसिस्ट आणि फार्मासिस्ट हा डॉक्टरांचा केंद्रबिंदू असतो सध्याच्या स्थितीत जर बघितलं या कोरोनाच्या काळात आपण बघत आहोत की औषध विक्रेता अतिशय जबाबदारीने काम करत आहे.

राज्यात काही ठिकाणी औषध विक्रेते आपल कर्तव्य बजावत असताना कोरोना मुळे दगावले आहेत.

या मुळे बुलढाणा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं यासाठी फार्मसी स्टूडेंट कौन्सिल चे जिल्हा संपर्कप्रमुख जीवन चेके यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाकडे ऑनलाईन निवेदना द्वारे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler