अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य करणारे प्रमोद पाटील यांचा चिखली मतदारसंघात व्यापक जनसंपर्क आहे. पक्षाध्यक्ष शरदराव पवार यांचे पुरोगामी आणि विकासात्मक विचार तळागाळापर्यंत पोहचवून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर वरिष्ठांनी सोपवली आहे. पक्षनेत्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही प्रमोद पाटील यांनी आपल्या नियुक्तीसंदर्भातील प्रतिक्रियेत दिली. या नियुक्तीबद्दल पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
