सिंदखेड राजा तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल ! ४ ,६५१ रुग्णांपैकी दम ४ '४ ४५ रुग्ण कोरोना मुक्त ! केवळ १८३रुग्ण घेत आहे उपचार ! ........!
सिंदखेडराजा प्रतिनिधी:समाधान बंगाळे
मागील तीन ते चार महिन्यांमध्ये संपूर्ण देशामध्ये विशेषता प्रत्येक सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना चा कहर हा वाढलेला होता .तालुक्यातील दरेगाव शिंदी ' गोरेगाव जागदरी अनेक गावांमध्ये कोरोना चा उद्रेक होता '
परंतु सरकारी रुग्णालयांनी काळजी तत्परता व तेवढ्याच तत्परतेने वरिष्ठांनी दाखवलेली समयसूचकता यामुळे कोरोनावर आळा बसला !
सिंदखेडराजा तालुक्यामध्ये एकूण ' 4651 कोरोना रुग्णांपैकी '4, 445
कोरोना रुग्ण . बरे झाले .व सध्या तालुक्यांमध्ये 183 रुग्ण उपचार घेत आहे 'व 23 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे '
त्यामुळे सिंदखेड राजा तालुका हा लवकरच कोरोना मुक्त होणार आहे '
तसेच तालुक्यातील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अनेक कोरोना रुग्णांना बरे केले आहे 'साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या उपकेंद्रात rt-pcr च्या2994 आणी रॅपिड टेस्टच्या 3579 तपासणी करण्यात आले 'त्यापैकी 810 कोरोना पॉझिटिव केसेस निघाल्या होत्या ! तसेच
साखरखेडा परिसरात अनेक गावे कोरोणाची नवे केंद्रे झाली होती '
साखरखेर्डा सुद्धा कोरोनाचा हॉस्पॉट होता .त्यामुळे खेड्यापाड्यातील लोक साखरखेडा येथे उपचारासाठी टाळत होते 'तरीही .गंभीर परिस्थितीत डॉक्टर गजानन चव्हाण हे लोकांच्या कोरोणा टेस्ट करायचे 'व प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार घ्या घरीच रहा असा सल्ला डॉक्टर संदीप सुरूशे देत 'औषध निर्माता गोपाल मानकर हे सुद्धा रुग्णांशी आपुलकीने वागत भेदभाव न ठेवता उपचार करीत ।रुग्णांची सेवा करता करता प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले तरीही त्यांनी धीर सोडला नाही .जी औषधे रुग्णांना दिली जाते तीच औषधे त्यांनी सुद्धा घेतली 'आणि ते सुद्धा कोराना मुक्त झाले आणि रुग्णांना सुद्धा त्यांनी कोरोणा मुक्त केले ' ८१० पैकी किमान 400 ते 500 रुग्ण कोरोना मुक्त झाले '
प्रत्येक गावात जाऊन 'डॉक्टर प्रविण ठोसरे डॉक्टर प्रशांत वायाळ डॉ रिंढे . यांच्यासह आरोग्य सेवक बी टी . गिरे ' जी ए. भोंडे .यांनी कॅम्प घेऊन कोरोना चाचणी घेतली त्यामुळेच ग्रामीण भागातील रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याचे पहावयास मिळते ' !
