ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आ. बंटी भांगडीया यांच्या नेतृत्वात भाजपा तालुका चिमूर च्या वतीने चक्का जाम आंदोलन.
प्रतिनीधी:-प्रविण वाघे नेरी मो, 7038115037
आज दि. २६ जून रोजी आ. बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात चिमूर येथे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करून राज्य शासनाच्या तुघलकी कारभाराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
चिमुरचे तहसीलदार संजय नागटीळक यांना निवेदन देण्यात आले व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. राजकीय आरक्षण संपवून ओबीसी समाजावर राज्य शासनाने जे अत्याचार सुरू केले आहे त्याविरोधात सर्व ओबीसी समाज बांधव एकत्र येऊन हा अत्याचार सहन करणार नाही यासाठी काही झालं तरी चालेल अशी मोठी ग्वाही देत ओबीसींचे राजकीय आरक्षण जर पूर्ववत झाले नाही तर, हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही आ. बंटी भांगडीया यांनी दिला.
याप्रसंगी प्रामुख्याने सर्वश्री भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, भाजपा जिल्हा सचिव राजूभाऊ देवतळे, भाजपा तालुका अध्यक्ष राजूपाटील झाडे, समीरभाऊ राचलवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, रमेश कंचर्लावार, पं.स. सदस्य प्रदीप कामडी, एकनाथ थुटे, विनोद चोखरे, अविनाश बारोकर, संदीप पिसे, प्रवीण गणोरकर, सुरज नरुले, प्रफुल कोलते, हरीश पिसे, सचिन फरकाडे, पुंडलिक मत्ते, महादेव कोकोडे, अनिल शेंडे, कन्हीलाल नाकाडे, सचिन बघेल, बंटी वनकर, अमित जुमडे, निखिल भुते, सचिन डाहुले, आसिफ शेख, गजू गुडधे, किशोर नेरलावार, लीलाधर बन्सोड, विनोद खेडकर, एकनाथ धोटे, पिंटू खाटीक, मनी रॉय, अजित सुकारे, संकेत सोनवाने, नितेश दोडके तसेच, जि.प. उपाध्यक्षा रेखाताई कारेकर, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा माया नन्नावरे, छाया कंचर्लावार, पायल कापसे, ज्योती ठाकरे, गीता लिंगायत, आशा मेश्राम, भारती गोडे, रत्नमाला मेश्राम, निताताई लांडगे, कल्याणी सातपुते, रंजना दडमल, निर्मला वाघमारे, वर्षा लोणारकर, वर्षा शेंडे, नाजमा शेख, पुष्पा हरणे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.