*राजश्री शाहु महाराजांचा आदर्श डोळया समोर ठेउन राज्यकर्त्यांनी आरक्षणाची तरतुद करावी*
एड राजु शेख
विशाल गवई तालुका प्रतिनिधी
चिखली महाराष्ट्र न्यूज 7083304124
चिखली :- भारतिय मानवाधिकार संघटन तसेच ऋणानुबंध समाज विकास संस्था व्दारा संचालीत जिजाऊ पॅरामेडीकल ईन्स्टीटयूट च्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्य मार्गदर्शक एड राजु शेख म्हणाले राजर्षी शाहु महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन राज्यकर्त्यांनी मराठा,ओबीसी व मुस्लीम आरक्षण जाहिर करावे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पाखरे न.प. प्रकल्प अधिकारी प्रमुख मार्गदर्शक एड राजु शेख अध्यक्ष सानीया संस्था
विशेष उपस्थीतीत प्रशांतभैया डोंगरदिवे जिल्हा अध्यक्ष, प्रमुख उपस्थीतीत हि रा गवई जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सुरडकर सामाजीक नेते विकास कस्तुरे तलाठी गजानन तीडके हे होते.
देशात सर्वत्र ओबीसी, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा सुरु आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी शाहु महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन जीसकी जीतनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर आरक्षण जारी करवे असे मत एड राजु शेख यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचे समयोचीत मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमासाठी अविनाश डोंगरदिवे, सौ लता डोंगरदिवे, सौ रुपाली डोंगरदिवे, सौ गवई, दिनेश आढवे तालुका अध्यक्ष, व्दारकाजी नकवाल उपाध्यक्ष, राजु शेख तालुका महासचिव, मनोहर घेवंदे, राहुल घेवंदे, यांनी परीश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जाकेराबी शेख जिल्हा सचिव तर आभार कल्पनाताई केजकर तालुका सचिव यांनी केले.
