भीषण अपघात :-* भीषण अपघातात युवकाचा मृत्यू

 *भीषण अपघात :-*  भीषण अपघातात युवकाचा मृत्यू


महाराष्ट्र न्युज 

उमरेड तालुका प्रतिनिधी

आशु लामसोगे 8855034555

दि.02 जून रोजी कुही वडोदा रोड वर ट्रक ने टुव्हीलर ला धडक दिल्याने मु.धामोडा येथील शेतकरी विजू शंकर खंडाळे ( वय 36 ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

विजू खंडाळे हे शेतकरी असून ते शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्याकरिता कुही इथे आले होते ते आपल्या गावाकडे परतीच्या मार्गाने जात असताना त्यांचा अपघात झाला त्यांना कुही येथील काही स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर मेडिकल इथे हलविण्यात आले  तिथेच त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


या ठिकाणी नागरिकांकडून वारंवार ब्रेकर ची मागणी करण्यात येत होती मात्र या ठिकाणी एकही ब्रेकर देण्यात आले नाही. आतातरी अशा घटना घडू नये करिता लवकरात लवकर ब्रेकर देण्यात यावे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler