महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील पंचायत समिती ब्रम्हपूरीअंतर्गत मेंडकी येथे बोडी खोलीकरण काम सुरू असून कोरोणा-१९ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी:- मनोज अगळे
मेंडकी,२ जुन २०२१:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील पंचायत समिती ब्रम्हपूरीअंतर्गत मेंडकी येथे बोडी खोलीकरण काम सुरू असून आज दिनांक २जुन २०२१ ला कोरोणा-१९ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सदर कामावर मजुरांना कोरोना-१९ बाबतची माहिती देण्यात आली तसेच त्याच कामावरील मजुरांची विशेष शिबीराद्वारे कोविड-19 अँटीजन टेस्ट व RT-PCR टेस्ट करण्यात आली.
या विशेष शिबिराला मा.थानेश्वर कायरकर सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी, डॉ शिरीष रामटेके गटविकास अधिकारी प स ब्रह्मपुरी, सौ.मंगलाताई ईरपाते सरपंच ग्रामपंचायत मेंडकी, सौ.मंगलाताई लोनबले माजी सरपंच ग्रामपंचायत मेंडकी, श्रीमती नयना गुरनुले सदस्य ग्रामपंचायत मेंडकी, सौ.पुष्पा गभणे सदस्य ग्रामपंचायत मेंडकी, राजेन्द्र आंबोरकर सदस्य ग्रामपंचायत मेंडकी, सौ.मोक्षाली शेंडे सदस्य ग्रामपंचायत मेंडकी, उमेश बुराडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, खोब्रागडे आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी, तांत्रिक सहाय्यक रंजित कसारे, चंदु जेल्लेवार रोजगार सेवक आदी उपस्थित होते.ह
