निलेश देशमुखची पोलीस कोठडीत रवानगी
मुरमावरुन वाद :कंत्राटदाराकडुन खंडणी मागीतल्याचे प्रकरण
आर्वी तालुका प्रतिनिधी_विलास महल्ले_988155411
आर्वी तालुक्यातील कौडन्यपुर रस्त्याच्या कामावर सुरु असलेली मालवाहू वाहने अडवुन एक लाख रुपयांच्या खंडणी ची मागणी केल्याच्या प्रकरणात निलेश देशमुख याला अटक करण्यात आली होती त्याला न्यायालयात हजर केले असता गुरवाला (ता, तीन) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे कौडन्यपुर आर्वी मार्गाचे अतिरिक्त काम अमरावती येथील शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत आहेत रस्त्याचे खोदकाम करुन मुरुम टाकने व सपाटी करन्याचे काम सुरू आहे निलेश देशमुख यांचे बुध प्रविण देशमुख यांच्या शेतामधुन (ता, 28 )पर्यंत मुरमाची ऊचल घेतली मात्र त्यानंतर मुरुम घेणे बंद केले दुसरीकडून मुरमाची ऊचल करने सुरू केली यावरून निलेश देशमुख संतप्त झाले त्यांनी शनिवारी( ता, 29) नांदपुर लगत काम सुरू असताना कंपनी चे मुरमाचे चार टीप्पर अडविले आनी सुपरवायझर अनिकेत वसु यांच्या सोबत वाद घालुन एक लाख रु दिल्याशिवाय काम सुरू करु नका अशी मागणी केली होती यामुळे क्षेत्र झाल्याने सुपरवायझर अनिकेत वसु यांनी कंपनी मालकाचा सल्ला घेतली आनी पोलीसात तक्रार केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी( ता ३१ )त्याला अटक केली आनी मंगळवारी (ता १) येथील दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्याय दंडधीकारी टि, एस, गायागोले यांच्या सामोरे सादर केले याप्रकरणी पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे निलेश देशमुख यांच्या गुरवाला (ता तीन) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत