लोकहिताच्या कामासाठी सदैव तत्पर; प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांचे आश्वासन.
संपादक ओम जायभाये
मो.नं:- 7058807386
करमाळा येथील भुषण पेट्रोल पंपावर करमाळा काँग्रेस पक्षाच्या वतीयेथील ट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आली.
यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत म्हणाले की, आज यांत्रिकीकरणामुळे शेतीची सर्व कामे ट्रॅक्टर द्वारे केली जात आहेत. परिणामी या डिझेल दरवाढीमुळे शेती कामे करण्याचे ही मुश्किल झाले आहे. अशातच केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल दर शंभरीच्या पुढे तर डिझेलचे दर ९० च्या पुढे तसेच घरगुती गॅसचे दरही १०० रूपये नी महाग झाले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात सतत वाढ सुरूच आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने सामान्य जनता त्रस्त झालेली असताना केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेल ची दरवाढ सुरू आहे. अशा या जुलमी सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर निषेध करतो.
यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक जगताप साहेब यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनावर हाजी फारूक बेग, औदुंबर उबाळे, दादासाहेब इंदलकर, बोरगावचे संजय शिंदेे, फारूक जमादार, साजीद बेग, असलम नालबंद, समीर शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
