पिरकल्यान गावात कृषी रत्न श्री दिलीप उदासी साहेब यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
आकाश खरात, जालना ग्रामीण प्रतिनिधी - 75078 82994
कृषी रत्न श्री दिलीप उदासी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल 10 जून रोजी सकाळी 10 वाजता पिरकल्याण गावांमधे कृषी सभा आयोजित झाली होती सदरील कृषी कार्यक्रम हा आयोजक श्री कृष्णा एस यादव तसेच कैलास घोलप यांनी आयोजित केला होता.कृषी रत्न मा. श्री दिलीप उदासी साहेब ह्यांनी कापूस, सोयाबीन ,तुर तसेच विविध पिकांवर मार्गदर्शन केले यावेळी विविध तंत्र वापरून शेतीतील उत्पन्न कसे वाढावे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले, सदरील ग्राम सभेत गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच उपस्थित होते ही सभा गावातील पवनसुत हनुमान संस्थान, पिरकल्यान या ठिकाणी आयोजित केली होती.