औरंगाबाद. विद्यापीठाने स्वीकारले संतपीठाचे पालकत्व.1 सप्टेंबरपासुन होणार प्रत्यक्ष सुरूवात. संतपीठासाठी विद्यापीठाने केली ५० लाखांची तरतुद शासनाने लाख रुपये देण्याचे केले मान्य विद्यापीठांत .
अभिषेक जगताप (औरंगाबाद )
जिल्हा प्रतिनिधी 90756 28711
एट्रान्स टू पॉलिटिक्स अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार. मराठवाडा ही संतांची भूमी आहे या भुमित संतपीठ व्हावे ही मागील 40 वर्षापासून ची मागणी आहे ही आपल्या कार्यकाळात पूर्णत्वास येत आहे ही आनंदाची बाब आहे असे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले त्यांचा आज दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र वेब न्यूज प्रतिनिधी शी संवाद साधला आता येथे सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात येणार आहे यासाठी शासनही आता 50 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.याआधी जिल्हा नियोजन निधीतून जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण यांनी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.विद्यापीठात मागील काही काळात चाललेला गोंधळ आता फारसा ऐकायला येत नाही यावर कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले माझ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले आहे.माझा दोन वर्षाचा कार्यकाळ समाधानाचा गेला असे डॉ येवले यांनी सांगितले. प्रतिनिधी अभिषेक जगताप महाराष्ट्र वेब न्यूज औरंगाबाद.