जरूड फाटा-यळंब घाट रस्त्यावर
वडगांव(कळसंबर) येथे पडलेले
जीवघेणे खड्डे तात्काळ बुजुन घ्या-
संतोष खंदारे.
ओम जायभाये
संपादक - 7058807306
बीड तालुक्यातील जरूड फाटा ते यंळब घाट रस्त्यावर वडगांव कळसंबर येथे वाळुच्या अवजड वाहतुकीमुळे जीव घेणे खड्डे पडले आहेत याचा येथील ग्रामस्थांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हा सदरील रस्ता सार्वजनिक उप बांधकाम विभागा मध्ये येत आहे तरी बांधकाम विभागाने यामध्ये तात्काळ लक्ष घालुन रस्त्यावरील सदरील खड्डे बुजुन घेण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे कार्यसम्राट युवक प्रदेशाध्यक्ष श्री.संतोष(भैय्या)खंदारे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदना द्वारे करण्यात आली आहे...
सदरील रस्ता बोरफडी, कारेगव्हाण, वडगांव (क), सोनपेठवाडी, सानपवाडी, जैताळवाडी, व यळंब घाट या गावाला जोडला गेला आहे आणि या रस्त्यावर असे जीव घेणे खड्डे पडले आहेत याचा येथील ग्रामस्थांना वयोवृद्ध व्यक्तींना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी तसेच डिलीवरी च्या पेशंटना दवाखान्यात जाण्यासाठी खुप त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार वरून या वरती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी संघर्ष सेने च्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल अशा ईशारा संतोष खंदारे यांनी निवेदना द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे...