सावली--लोढोंली-हंराबा मुख्य मार्गावर पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने डांबरीकरण न करता टाकली भिसी माती.
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार 9623494935
सावली- सावली पासून हंराबा हे गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे .हरांबा येथे हायस्कूल आहे तसेच लोंढोली येथे बॅंक आहे.सावली येथे तहसील कार्यालय . पंचायत समिती . दवाखाना येथे कामांकरिता ये जा करण्यासाठी लोकांची वर्दळ असते.पण मुख्य मार्गावर पाईपलाईनचे काम केले असून तेथे डांबरीकरण न करता भिसी माती टाकण्यात आली असुन तेथे पाणी साचून घानिचे साम्राज्य पसरले आहे.त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देवून तेथे कोणतेही अपघात होनार नाही याची दक्षता घेऊन लवकरात लवकर डांबरीकरण करावे अशी मागणी हंराबा.उमरी .लोढोली . येथील गावकऱ्यांनी केलीआहे.
