!!वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी!! जालना
!!वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी!! रामप्रसाद शेळके .
तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना.या शाळेत वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी यांनी विद्यार्थांना वृक्षाचे महत्व सांगितले त्यांनी विद्यार्थांना वृक्ष लागवड मोहीमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे.
वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे.
परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे,असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी केले.यावेळी उपस्थित गावचे माजी उपसरंपच मा.श्री.अर्जुनराव घाटे,तसेच युवा नेते कैलासभाऊ डुकरे व तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेचे विद्यार्थीं व विद्यार्थींनी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,
श्री.मदन.वाय.बी.,
श्री.सोनकांबळे.डी.एन.,
श्रीमती.देशपांडे.ए.बी.,
श्री.जाधव.एल.बी.,
श्री.ठाकरे.आर.एस.,
श्री.राऊत.एस.बी.,
श्रीमती.खरात.एम.ए.आदिची उपस्थिती होती......