वाघाची शिकार करून अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक
उमरेड तालुका प्रतिनीधी
मनोज चाचरकर मो.9970643453
वाघाची शिकार करून अवयव तस्करी करणाऱ्या आरोपीला नागपूर वन विभागाच्या पथकाने मध्यप्रदेशातील बिचथा सहानी गावातील त्याच्या घरात गुरुवारी दि.29 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास धाड टाकून अटक केली. आरोपी मोतीलाल तेजा सलामे वय 55 वर्ष राहणार बिचथा सहानी (मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव असून, सावनेर न्यायालयाने आरोपीला तीन ऑगस्ट पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. नागपूर वन वन विभागाच्या पथकाने गुरुवारी आरोपीच्या घरी जाऊन 29 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास वाघाची संपूर्ण कातळी, वाघाचे अवयव व आरोपीच्या जिओ कंपनीचा मोबाइल जप्त केले. 43 50 व 49 नुसार वन गुन्हा दाखल करून सावनेर चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात उभे केले. न्यायालयाने आरोपीला तीन ऑगस्ट पर्यंत वन कोठडी सुनावली. ही कारवाई उपवन संरक्षण नागपूर विभाग नागपूरचे डॉ.भरतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड चे पथक प्रमुख सहाय्यक वनरक्षक व खापा वन क्षेत्रातील वनरक्षक यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.