बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामावर नगर परिषदेची कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
चंद्रभान झिने| तालुका प्रतिनिधी - 84594 19245
शहरातील जुना जालना रोड येथील अनंता रतनलाल बन्सीले, वय 64 मयूर अनंता बन्सीले, वय 29 यांच्यावर देऊळगावराजा पोलीस ठाण्यात म. प्रा.नि.न.अ.1966कलम 529 व 43 तसेच भारतीय दंड संहिता. 1860 नुसार कलम 188 नुसार गुन्हा दि.19/7/2021 रोजी नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की शहरातील जुना जालना रोडवर बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम करत असल्या बाबत सामाजिक कार्यकर्ते मो. अश्फाक मो. शफी रा. देऊळगाव राजा.यांनी नगरपरिषद देऊळगाव राजा यांना बेकायदेशीर अनधिकृत बांधकामाबाबत कळविले होते.
तरी वेळोवेळी मुख्याधिकारी नगरपरिषद दे. राजा यांनी बांधकाम बंद करण्याची नोटीस देऊन ही गैरअर्जदार त्यांची दखल न घेता बांधकाम सुरू ठेवले.
बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्यास पुराव्यानिशी सामाजिक कार्यकर्ते मो. अश्फाक मो.शफी. यांनी मा. मुख्याधिकारी नगरपरिषद देऊळगाव राजा यांची भेट घेऊन संपूर्ण घडलेल्या प्रकरणाबाबत अवगत केले.
तेव्हा कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नगरपरिषद देऊळगाव राजा यांनी तात्काळ गैरअर्जदार. अनंता रतनलाल बन्सीले, व मयुर अनंता बन्सीले, यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे व पुढील बांधकाम थांबण्याचे आदेश दिले. यामुळे मुख्याधिकारी यांनी केलेल्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणा-याचे धाबे दणाणले आहेत.