पुतळा भवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी धरणे
शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाला जाग
चंद्रभान झिने| देऊळगाव राजा
देऊळगाव राजा,ता.२६ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक सभोवताली असलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी वारंवार अर्ज देऊनही अतिक्रमण जैसे थे होते दरम्यान आज (ता.२६) शिवप्रेमींनी नगरपालिके समोर धरणे देतात पालिकेला जाग आले व शिवाजी महाराजांच्या स्मारका भोवतीचे अतिक्रमण पालिकेने हटविले
छत्रपती शिवस्मारक समितीच्या माध्यमाने नगरपालिकेला लेखी निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक भोवती असलेले भाजीपाला व फ्रुटच्या हातगाड्या हटविण्या ची मागणी केली होती स्मारक देखरेख समितीने दिलेल्या इशाऱ्यानंतर ही अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने शिवप्रेमींनी नगरपालिके समोर धरणे दिले यानंतर लगेच पालिका प्रशासनाला जाग आले प्रशासनाने तात्काळ भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविण्याची कारवाई केली दरम्यान माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी पालिका प्रशासनाशी चर्चा केली व यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक भवती अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाईचे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले सदर धरणे आंदोलनात डॉ रामप्रसाद शेळके,एडवोकेट सतीश नरोडे,राजेश इंगळे,संतोष राजेजाधव,हर्षवर्धन देशमुख,अतिश खराट,झहीर पठाण,अभय दिडहाते,बंटी सूनगत,पप्पू लाड,राजेश सपाटे आदिनी सहभाग घेतला
*फोटो ओळी देऊळगाव राजा- पालिकेसमोर धरणे देताना शिवप्रेमी
