धक्कादायक:-पतीचा पत्नीवर चाकू हल्ला काजळसर येथील घटना पत्नी गंभीर जखमी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे मो, 7038115037
चिमुर:- चिमुर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या काजळसर येथे दि25 ला सकाळी 10 वाजता दरम्यान पत्नी रोवणीच्या कामाला जात असताना पतीने सायकलने येऊन तिला वाटेत मध्येच अडवून भांडण करून राग अनावर झाल्याने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीवर वार केला यात चाकूचा वार उजव्या गालावर लागताच ती गंभीर जखमी झाली आणि ओरडायला लागली तेव्हा आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला
सविस्तर वृत्त असे की काजळसर येथील महिला सौ मथुरा महादेव सामुसाकडे वय 55 वर्षे ही दि25 जुलै ला सकाळी 10 वाजता दरम्यान रोवणीच्या कामाला जात असताना आरोपी पती महादेव सामुसाकडे वय 62 वर्षे हा सायकलने येऊन वाटेत पत्नीला अडवून भांडू लागला कडाक्याच्या भाडणानंतर पती महादेव यांचा राग अनावर झाला आणि त्याने भाजीपाला कापण्याचे चाकू काडून सरळ पत्नीवर हल्ला केला यात तिच्या उजव्या गालावर वार लागला ती गंभीर जखमी झाली व वेदनेने आरडाओरडा करू लागली तिच्या ओरडण्यामुळे पती महादेव याने घटनास्थळा वरून पोबारा केला ती कशी बशी गावात आली आणि तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सदर घटनेची माहिती नेरी पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवीत आरोपी पती महादेव सामुसाकडे यांच्यावर गुन्हा ची नोंद करीत आज दि 26 जुलै ला आरोपी ला जेरबंद करीत अटक केली सदर फिर्यादी महिला ही चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे सदरची कारवाई नेरी पोलीस चौकी चे इचार्ज पी-एस-आय राजू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई सचिन साठे विशाल वाढई यांनी चोखपणे बजावीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत
