ब्रम्हपूरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

ब्रम्हपूरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

तालुका प्रतिनिधी

मनोज अगळे 9765874115




ब्रम्हपूरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा दोन लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त...सदर कारवाईत सहा जुगारी जेरबंद तर तीन फरार...

ब्रम्हपूरी : पो. स्टे. ब्रम्हपुरी अंतर्गत कहाली रोड वीटभट्टी जवळ पो. स्टे च्या विशेष पथकाने जुगार धाड कारवाई केली . सदर कारवाईत आरोपी आशिष पिल्लेवान, आदर्श बनकर, आजाद लोखंडे तिघेही रा.कहाली,  नरेंद्र मेश्राम,  उमेश रावेकर दोन्ही रा. ब्रह्मपुरी प्रविण दोनाड दिघोरी, असे एकूण सहा आरोपी जुगार खेळताना मिळून आले तर उर्वरित तीन आरोपी हे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.सदर कारवाईत जुगारातील वीस हजार 600 रुपये नगदी तसेच आरोपींच्या ताब्यातील मोबाईल एकूण किंमत अंदाजे 24 हजार रुपये तसेच घटनास्थळी मिळून आलेल्या एकूण पाच मोटर सायकल किंमत दोन लाख 55 हजार रुपये असा एकूण दोन लाख 99 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिळून आलेले नमूद सहा आरोपी व पळून गेलेले तीन आरोपी अशा एकूण नऊ आरोपीतांवर मुंबई जुगार कायदा कलम 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कारवाई मा.सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे, पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री आशिष बोरकर ,पोहेका नरेश रामटेके ,रवींद्र पिसे, नापोका उमेश बोरकर, मुकेश गजबे ,नितीन भगत,पोका नरेश कोडापे ,प्रमोद सावसाकडे ,प्रकाश चिकराम यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler