चिमुर तालुक्यातील सिरपूर येथील स्मशान भूमीची दशा आणि दुर्दशा प्रेत दहन शेडची अवदश्या ग्रामपंचायत चे दुर्लक्ष,
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
प्रविण वाघे
चिमुर:-चिमुर तालुक्यातील सिरपूर येथील स्मशान भूमीतील प्रेतदहन शेड ची बिकट अवस्था झाली आहे
प्रेत दहन शेड फक्त नावालाच राहिले आहे शेड वर पत्रे राहिले नाही या मुळे कुटुंबीयांची पावसाळ्यात प्रेत जाळतांना आजुबाजुने प्लास्टिक कापड व अनेक मार्ग काढुन प्रेत जाडावे लागतो नागरीकांना नाहक असा त्रास करुन अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,
स्मशान भूमीतील आजुबाजूच्या परिसरात गवताचे व जाळ्यांचे साम्राज्य पसरले आहे तरी गावातील ग्रामपंचायत सिरपूर येथील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी दखल घ्यावी व या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यांत यावे अशी मागणी नागरीकांची आहे,