शिवसंपर्क अभियानास सिंदखेड राजा तालुक्यातुन सुरुवात.
तालुका प्रतिनिधी
समाधान बंगाळे 93565 67231
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मा.खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली व मा आ डॉ शशिकांत खेडेकर,ऋषीभाऊ जाधव, मा बाबुराव मोरे, मा शिवप्रसाद ठाकरे, नगराध्यक्ष सतीश तायडे उपसभापती बंद्री बोडके, यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदखेडराजा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात.मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही शिवसंपर्क अभियान भगव्यामय वातावरणात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. "शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात" हे ब्रीदवाक्य घेऊन बुलडाणा जिल्ह्यात गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक पोहचविण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख मा खा प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना जिल्हा प्रमुख मा जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा आ डॉ शशिकांत खेडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव , उप जिल्हा प्रमुख बाबुराव मोरे,तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,नगराध्यक्ष सतीश तायडे, यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत सिंदखेडराजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिततीत साखरखेर्डां येथे दि १७/७/२०२१ रोजी शिवसंपर्क अभियानाला सुरवात करण्यात आली.
यावेळी सिंदखेडराजा तालुक्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
