वाळू टिप्परच्या धडकेत युवक ठार चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दखल

 वाळू टिप्परच्या धडकेत युवक ठार

चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दखल



चंद्रभान झिने| तालुका प्रतिनिधी


 देऊळगाव राजा,ता.१५ ः दुचाकीस्वार युवकास मागून धडक दिल्याने उपचारादरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता.१५) घडली याबाबत पोलिसांनी वाळू टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला 

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार देऊळगाव मही बाजार समिती समोर वाळूच्या टिप्परने समाधान निवृत्ती भागिले वय ३२ यांच्या दुचाकीस वाळूच्या टिप्परने मागून धडक दिली सदर अपघात देऊळगाव मही येथे १४ जुलै रोजी दुपारी घडला ह्या अपघातात समाधान भागिले गंभीर जखमी झाले त्यांना प्रथम जालना व नंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली याबाबत मृतक युवकाचा चुलत भाऊ हर्षल दत्तात्रय भागिले राहणार टाकरखेड भागीले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नितीन भगवानराव शिंगणे व संजय पऱ्हाड यांच्या मालकीच्या टिप्पर चालकाविरुद्ध भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून फिर्यादीच्या चुलत भावाचे मृत्यूस कारणीभूत ठरणें व दुचाकीस नुकसान पोहोचविणे बाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक फौजदार अकील काझी तपास करीत आहे

तालुक्यातील रेती घाटातून अवैध रेती उत्खनन करून अनेक विना नंबरचे वाळूटिप्पर पकडले जाण्याच्या भीतीने भरधाव वेगाने धावतात टिप्पर चालक निष्काळजी पणाने आपल्या ताब्यातील वाहन चालवीत असल्याने रस्त्यावर इतर वाहने पादचारी सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे दरवेळी विना नंबरच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणारे पोलीस व आरटीओ मात्र विना नंबरच्या वाळू टिप्पर कडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष का करीत असतील हा संशोधनाचा विषय ठरत आहे विना नंबरच्या वाळू टिप्परच्या धडकेने काल निष्पाप समाधान भागिले यास जीव गमवावा लागला यापूर्वीही कुंभारी टी पॉईंट नजीक विना नंबरच्या टिप्परने जवळखेड येथील एका व्यक्तीसह त्याच्या चिमुकल्या मुलीला चिरडले होते या अपघातात ते दोघे जागीच ठार झाले होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler