राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी इरफानअली शेख यांची निवड
समाधान बंगाळे ।तालुका सिंदखेडराजा प्रतिनिधी
दुसर बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी उपसभापती इरफानअली शेख यांची प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड केली. यावेळी पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अर्थ व बांधकाम सभापती रियाजखा पठाण, माजी जिप उपाध्यक्ष संतोष रायपुरे माजी कृषी सभापती नरेश शेळके संगीतराव भोंगळ पाटील हे उपस्थिती होते.
समाजाचे आधारवड व धाडसी नेतृत्व करत इरफानअली शेख यांनी राजकीय व सामाजिक कार्यात पुढाकार घेत राष्ट्रवादीतून राजकीय प्रवासास सुरुवात केली. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे ते खंदे समर्थक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस ते प्रदेश कार्याध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे नुकत्याच मुंबईतील बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देत त्यांची निवड केली. इरफान अली शेख यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्धल राजकीय आणि सामाजिक स्तरातुन महाराष्ट्रभर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.
