परसोडा येथील गोठ्यात बांधलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

परसोडा येथील गोठ्यात बांधलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- वरोरा तालुक्यातील परसोडा या गावातील शेतकरी संजय रामाजी पावडे रोज च्या ठरल्याप्रमाणे आपल्या बैलाला बाहेर काढण्यासाठी नेहमीच्या वेळेवर गोठयात गेले असता त्यांना एक बैल पडलेल्या अवस्थेत दिसला त्यांनी बैलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण उठला नही शेतकऱ्यांनी  वेळ न करता एका परिचित असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला ना प्राचारण केले असता ते वेळेवर हजर राहू शकले नाही आणि त्यातच बैलाचा मृत्यु झाला. गावकऱ्यांनी निरखून पाहिले असता बैलाच्या शेपटीला सापाच्या चावण्याचे घाव दिसले त्यातच बैलाचा मृत्यू झाला असे गावकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी असे  शेतकऱ्याची मागणी आहे ऐन शेतीच्या कामास सुरवात झाली आणि बैलाचा मृत्यू झाला  शेतकरी विवंचनेत सापडला आहे तात्काळ वनविभाग त्या शेतकऱ्यांना भरपाई देते की नही यावर सर्वांचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler