जहाल विषारी पटेरी मण्यार साप सर्पमित्रांनी पकडला.
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता उमेश गोलेपल्लीवार
मो.7218949428
सावली-सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील विनोद शेंडे यांच्या घराजवळील परीसरात रात्रोच्या सुमारास विषारी साप असल्याची माहिती टायगर वन्य जीव रक्षक संस्था सावली च्या व्याहाड खुर्द येथील सर्प मित्र नितीन पाल.चितामंण तरारे श्रीकांत यम्पलवार मयुर यांना देण्यात आले.त्यांनी विषारी सापाला पकडत असताना पट्टेरी मण्यार साप दिसले सर्पमित्रांनी हुशारीने या सापाला पकडले व वनपाल यांना माहीत दीली.टायगर वन्य जीव रक्षक संस्था सावली चे अध्यक्ष विवेक लेनगुरे.प्रकाश शेंडे यांनी त्या सापाची नोंद करण्यासाठी वनविभाग कार्यालय सावली येथे आणले.त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी.वनपाल कोडापे यांनी नोंद घेत त्या सापाला वनपरिक्षेत्र सावली येथे सोडण्यात आले.