ग्रामपंचायतीच्‍या सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे विज कनेक्‍शन कापण्‍याची महावितरणची अन्‍यायकारक मोहीम त्‍वरीत थांबवावी– अविनाश पाल भाजपा तालुका अध्यक्ष

ग्रामपंचायतीच्‍या सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे विज कनेक्‍शन कापण्‍याची महावितरणची अन्‍यायकारक मोहीम त्‍वरीत थांबवावी– अविनाश पाल भाजपा तालुका अध्यक्ष


सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता उमेश गोलेपल्लीवार

मो.7218949428



सावली - ग्रामीण भागामध्‍ये ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे विजबिल न भरल्‍यामुळे महावितरणकडून विज कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम चालविण्‍यात आली आहे. ही मोहीम तात्‍काळ थांबवून ग्रामपंचायतीच्‍या सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे कनेक्‍शन पूर्ववत करून अखंडीतपणे विज पुरवठा करावा व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अन्‍यथा या महावितरणच्‍या अन्‍यायाविरोधात रस्‍त्‍यावर उतरून भारतीय जनता पार्टीतर्फे तिव्र आंदोलन उभारण्‍यात येईल, असा ईशारा भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी दिला.  ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बेताची असल्‍यामुळे विजबिल भरण्यास उशीर होत आहे, त्यांनी तशी मुदत देखील मागितली आहे, तरीही महावितरणाद्वारे ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्‍ट्रीटलाईटचे कनेक्‍शन तोडण्‍याची मोहीम चालविण्‍यात आली आहे. त्याचा फटका नागरिकाना बसत आहे. सध्‍या पावसाचे दिवस सुरू असून साप, विंचु निघत असतात. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी प्रकाशाची व्‍यवस्‍था असली पाहीजे. ग्रामपंचायतीने विजबिल भरण्‍यासाठी काही मुदत मागीतली आहे. त्‍यामुळे त्‍यांना ती मुदत देवून पावसाळा निघुन गेल्‍यानंतर यावरती यथायोग्‍य मार्ग काढून समस्‍या सोडविण्‍यात यावी त्‍याचप्रमाणे सार्वजनिक प्रकाशयोजना कायम ठेवून नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्‍यात येत आहे. नागरिकांवर अन्‍याय करून विज कनेक्‍शन कापल्‍यास भारतीय जनता पार्टी आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर उतरेल असा ईशारा यावेळी अविनाश पाल भाजपा तालुका अध्यक्ष यांनी दिलेला आहे. यावेळी भाजपा सावली च्या वतीने महावितरण कंपनी तथा महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निषेध करून महावितरण कार्यालय सावली येथे निवेदन देण्यात आले आणि तहसीलदार सावली यांचे मार्फत मुखमंत्री, ऊर्जामंत्री व जिल्हाचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडी तिन चाकी सरकारचा निषेध करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,सावली तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, माजी बाधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, देवराव मुद्दमवार, प्रकाश पा. गडमवार, रविद्र बोलीवार प.स. उपसभापती, तुकाराम ठीकरे माजी उपसभापती, माजी सभापती सौ. छायाताई शेन्डे, जिल्हा परिषद सदस्य सौ. योगीता डबले, युवा तालुका अध्यक्ष विनोद धोटे, अरुन पाल, राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष जिबगाव . टिकाराम मशाखेत्री महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष.  पारस नागापुरे ग्रा. प. उपसंपच पारडी. राकेश घोटेकर ग्रामपंचायत सदस्य. कीशोर घोटेकर, विठल येगावार, शुभागी मडावी, साधना रोहणकर, कविता बोलीवार सरपंच व्याहाड बु. आणि ग्रा. सरपंच, सदस्य तथा भाजपा कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler