ब्रेकिंग. वारंवार निवेदन देऊन सुध्दा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर
मो,न,8308264808
शेगाव बू ही मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठ मध्ये रस्त्यावरील मुख्य पुलाला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, यावेळी रस्त्याने येणाऱ्या नागरीकांची संख्या जास्त असून व तसेच पावसाळ्याचे सुद्धा दिवस असल्याने कोणतीही जीवितहानी होऊ शकते असे सांगत येत नाही तसेच गावातील एकाच रस्त्यावरील पुलाला खड्डे पडलेले नसून असे बऱ्याच ठिकाणी सुद्धा पुलाला खड्डे पडलेले आहेत असे दिसून येत आहे आणि ज्या वार्डातील रस्त्यावरील पुलाला खड्डे पडलेले आहेत त्या वार्डातील नागरिकांनी ग्रामपंचायत ला सांगितले असून, सदर नियमितपणे निवेदन सुद्धा दिले आहे तरीपण या कामाकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजगी दिसून येत आहे

