वाढदिवसानिमित्त पिरकल्याण गावात वृक्ष लागवड...
प्रविण हिवाळे, जालना तालुका प्रतिनिधी 91562 04245
वाढदिवसानिमित्त पिरकल्याण गावात श्री पवनसुत हनुमान संस्थान तीर्थक्षेत्र (क) पिरकल्याण परिसरात गुरुवर्य प. पू. बलदेवानंदजी गिरी महाराज यांनी सुरू केलेल्या वृक्ष लागवड अभियान मोहिमेमध्ये लक्ष्मण नाना शिंदे पाटील व राहुल शिंदे पाटील यांनी सहभाग नोंदविला व तसेच यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व पंचायत समिती सदस्य श्री वसंत शिंदे पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते
आणि सर्वांच्या उपस्थितीत लक्ष्मण नाना शिंदे पाटील व राहुल शिंदे पाटील यांनी पवनसुत हनुमान संस्थान पिरकल्याण परिसरात वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड केली.