सिरपूर गट ग्राम पंचायतीचा निष्काळजी पना
शिवनपायली गावात गोबरगॅस च्या खड्याच्या साचलेल्या पाण्या मुळे अनेक घरांना नुकसान.
गावातील ग्राम सदस्य यांची आधंड्या व बहिऱ्याची भूमिका .
चिमूर तालुक्यातील डेंग्यू मलेरिया ची साथ असून गावतील गोबरगॅस चे खडे ठरत आहे रोगराईला जाहीर आमंत्रण.
अनेक तक्रारी देऊन सुद्धा अजून पर्यंत कारवाई नाही.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे, मो, 7038115037
चिमूर : - तालुक्यातील सिरसपूर गट ग्राम पंचायत शिवणपायली मध्ये रहिवासी हेमंत रामदास पोहिंकर व विकास रामदास पोहिंकर हे अनेक वर्षा पासून गोबरगॅस च्या खड्या मुळे नाहक त्रास होत असून त्या समधात अनेक तक्रारी देऊन झाल्या परन्तु ग्राम पंचायत सदस्य व सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही उलट ज्या समधीत व्यक्ती चे खड्डे आहे त्याना पाठबळ देत असून त्याच खड्यात संडास व ईतर सांडपाणी जमा होऊन पावसाळ्यात पाणी साचून ते पाणी घरात शिरतो दोन दिवसांपूर्वी विकास पोहिंकर याच्या घरातील भीत रात्रीच्या वेळी त्याच गोबरगॅस च्या साचलेल्या पाण्यामुळे पडकी त्या मध्ये नशिबाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीपरंतु समोर त्या गोबरगॅस च्या खड्ड्या मुळे जीवितहानी व वित्त हानी होऊ शकते गावातील
गजानन नाकाडे व तुकाराम परवते या व्यक्तीचे गोबर गैस चे खड्डे असून त्या व्यक्तीना राजकीय पक्षांचे पाठबळ असल्याने म्हणून त्याच्या कोणत्याही प्रकारची कारवाई ग्राम पंचायत चे सरपंच व सदस्य आधंळे व बहिऱ्यांची भूमिका घेत आहे.
त्या साचलेल्या पाण्याने रोग राईला प्रसारला माध्यम ठरत असून या कडे समंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष वेधून न्याय मिळावा या बद्दल अनेक वर्षा पासून त्या बद्दल तक्रारी देऊन सुद्धा या कडे लक्ष देत नाही
मला न्याय मिळेल का न्याय अशी आर्त हाक पत्रकारांच्या च्या समोर व्यथा सांगीतल्या.
