गडबोरी ग्रामपंचायतनी फासला स्वच्छ भारत अभियानाला काळीमा, पुरस्कारप्राप्त गावात हागणदारीमुक्तीचा ऊडाला फज्जा,

गडबोरी ग्रामपंचायतनी फासला स्वच्छ भारत अभियानाला काळीमा, पुरस्कारप्राप्त गावात हागणदारीमुक्तीचा ऊडाला फज्जा, 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी

प्रवीण वाघे मो, 7038115037



सीन्देवाही:-महाराष्ट्र शासनाने खुप गाजावाजा करीत हागणदारी मुक्तीचा संदेश देऊन स्वच्छ भारत अभियान राबविले यासाठी हागणदारी मुक्त गावाला पुरस्कार देऊन गौरव सुद्धा केला मात्र सीन्देवाही पंचायत समिती  अंतर्गत येणाऱ्या गडबोरी येथे रस्त्यालगत गावातील नागरीक हे शौचास जातात यामुळे मुख्य मार्गावर अपेक्षा नाही अशी घानीचे साम्राज्य पसरले आहे या रस्त्याच्या आजुबाजूच्या काही नागरीकांची घरे आहेत गावामध्ये शौच्छालय असुन सुद्धा गावातील काही नागरीक त्याचा वापर करीत नसल्याची धक्कादायक बाब या निमित्ताने गडबोरी गावातील उघडकीस आली आहे सध्या डेंग्यू मलेरिया सारख्या असंख्य रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नागरीकांना घानीच्या साम्राज्या मुळे नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत ग्रामपंचायतला वारंवार तोंडी सुद्धा सांगितले आहे मात्र आजपर्यंत ग्रामपंचायत पदाधिकारी काना डोळा करीत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या करीता ग्रामपंचायत च्या वतीने त्वरित बंदोबस्त करावा यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे सीन्देवाही गडबोरी वासेरा मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजुला घान पसरली आहे ग्रामपंचायत प्रशासनाने मुक्त हागणदारी वर कोणतीच कारवाई न केल्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऊद्भवल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत रराहील व वीस दिवसाच्या आत याकडे लक्ष दिले नाही तर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेमार्फत ग्रामपंचायत कार्यालयाला एका निवेदनाद्वारे देण्यात आला, आता ग्रामपंचायत त्वरीत याकडे जाणीवपुर्वक लक्ष देऊन कार्यवाही करतील का याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहेत, यावेळी रोशन सोनवाने, सुरज कोडापे , सुभाष मेश्राम अन्य गावकरी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler