आंबेनेरी येथील अपघातग्रस्त युवकाला आमदार बंटीभाऊ भांगडीया कडून मदतीचा हात
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे, 7038115037
नेरी। नेरी येथून जवळ असलेल्या आंबेनेरी येथील अपघातग्रस्त निकेश मोहन ठवरे या युवकाचा अपघातात एक पाय निकामी झाला त्या पायावर उपचार करण्यासाठी या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी उपचारासाठी तात्काळ मदतीचा हात पुढे करीत आर्थिक मदत केली
सदर अपघात हा मागील काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात इतका भयानक होता की या अपघातात निकेश च्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे पाय निकामी होण्याची शक्यता डॉकटरानी सांगितले यावर उपचार कसे करावे हा प्रश्न निकेश समोर पडला कारण त्याची परिस्थिती खूपच हलाखीची होती ही बाब गावातील कार्यकर्त्यांनी आमदार बंटीभाऊ याना कळविताच त्यांनी तात्काळ निकेश च्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करीत आर्थिक मदत दिली ही मदत कार्यकर्त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली यावेळी राजुभाऊ देवतळे जिल्हा सचिव भाजपा रमेशजी कांचार्लावार काकाजी संदीप दोडके सरपंच आंबेनेरी अकोश चावरे आंबेनेरी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
