सावली तालुक्यातील प्रकार वैद्यकीय अधिकारी विना आरोग्य यंत्रणा आजारी

सावली तालुक्यातील प्रकार वैद्यकीय अधिकारी विना आरोग्य यंत्रणा आजारी 


सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता गोलेपल्लीवार मो. 9623494935


सावली -तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक दिवसापासून रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण वैद्यकीय यंत्रणाच आजारी पडल्याचे चित्र तालुक्यात दिसुन येते आहे. कोरोना ची तिसरी लाट येण्याचा धोका  असतानाही सावली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली, बोथली, जीबगाव हे  मोठे क्षेत्र असून या आरोग्य केंद्रात मागील कित्येक दिवसापासून एकाही वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून जास्त पैसे मोजावे लागत आहे. या कालावधीत अनेक साथीचे आजार पसरत आहेत. शिवाय कोरोना च्या तिसऱ्या लाटेची दहशत कायमच आहे. दरम्यान आरोग्याच्या संकटाचा सामना करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची  गरज असताना वरिष्ठांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपचार तालुक्यात आठ आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत. त्यापैकी सात समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. मात्र यांचेकडून आरोग्य अधिकाऱ्यांचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी हे अर्हता धारक नसतानाही त्यांचेकडून उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सावली तालुक्यात दिसून येत आहे. सहापैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध न करून देणे हा वरिष्ठ आरोग्य आरोग्य यंत्रणेने कळस गाठल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler