अंगणवाडी क्रमांक २ जिबगाव येथे ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांचेकडून सिलिगं फॅन भेट
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार मो.९६२३४९४९३५
सावली- सावली तालुका पासुन ९किलोमीटर अंतरावर असलेल्या जिबगाव येथे ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष यांनी अंगणवाडी क्रमांक २येथे भेट दिली असता त्यांच्या लक्षात आले की येथे ०ते६ वयोगटातील मुले-मुली शिक्षण घेतात व त्या लहान मुलांना उन्हाळ्याच्या दिवसात गरमिचा नाहक त्रास सहन करावा लागतो.हे लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी दखल घेत अंगणवाडी क्रमांक २ येथे सिलींग फॅन भेट दिली. तेथे. उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार . आशिष गडपल्लीवार . नागेश बारसागडे सावली तालुका प्रतीनीधी प्राजक्ता गोलेपल्लीवार.आंगनवाडी सेविका मनिषाताई चुदरी.आंगनवाडी मदतनीस लताताई भोयर.उपस्थीत होत्या.
