ब्रेकिंग न्यूज--युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

 ब्रेकिंग न्यूज--युवकाचा सर्पदंशाने मृत्यू 

  

सावली तालुका प्रतीनीधी

 प्राजक्ता गोलेपल्लीवार 9623494935


सावली-सावली तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरी येथील संदीप लालाजी शेट्ये वय 32 वर्षं यांचे सकाळी निधन झाले.सदर युवक काल शेतावर गेला होता.सापाने चावा घेतल्यामुळे संदिपचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जात आहे.संदिप दिवसभर शेतात काम करुन घरी आले असता रात्री उशिरा त्यांना वेदना जाणवू लागल्याने.सकाळी कुटुंबातील व्यक्तींना लक्षात आले असता त्यांने प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली येथील रूग्नवाहीका करीता फोन करण्यात आले.पंरतु रुग्णवाहिका येण्याआधीच संदिपचा मृत्यू झाला.मृत्युचे कारण अजुनही स्पष्ट झाले नाही.या प्रकरणी सावली पोलिसांना माहिती दिली असता.पोलिसांनी घटनास्थळ गाटुन प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.या व्यक्तीच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler