खेडी येथे तांडा वस्ती सुधार योजना कामाचे भूमिपूजन संपन्न
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार मो. 9623494935
सावली- सावली तालुका पासुन 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडी येथे माननीय नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे प्रयत्नातून मंजूर झालेल्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना कामाचे भूमिपूजन खेडी येथे करण्यात आले. भटक्या जाती जमाती वसाहतीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेंतर्गत वस्तीच्या सुधारणेसाठी कामे केली जातात. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यात 1 कोटी 63 लाख रुपयाची कामे मंजूर केले. खेडी येथे 10 लाख रुपयांचे नाली व सिमेंट रोड मंजूर करण्यात आले. या कामाचे उदघाटन पंचायत समिती सभापती विजय भाऊ कोरेवार, सरपंच सचिन काटपलीवार, उपसरपंच मुक्ताताई गरतुलवार, ग्रामपंचायत सदस्य परशुराम मर्लावार, शालिनी अलाम, निराशा कटकमवार, माया माचेवार, बिराजी नेरडवार, पोलिस पाटील कृपाल दुधे, अतुल येलेटीवार, नरेंद्र राचेवार, राजू कंचावार आदी उपस्थित होते.