ध्येय प्रेरित शेतकरी कुटुंबातील पुरुषांनी केली बचत गटाची स्थापना, शेतकरी पुरुष बचत गट गडचिरोली स्थापनेला 10 वर्ष पूर्ण.

ध्येय प्रेरित शेतकरी कुटुंबातील पुरुषांनी केली बचत गटाची स्थापना, शेतकरी पुरुष बचत गट गडचिरोली स्थापनेला 10 वर्ष पूर्ण.


संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


बचत गट ही काळाची गरज आहे,

बचत करणे म्हणजेच आर्थिक उन्नती व्हावी व बचतीची सवय लागावी या हेतूने मागील दहा  वर्षांपूर्वी 20 शेतकरी कुटुंबातील पुरुषांनी एकत्र येऊन बचत गटाची स्थापना केली,बचत गटाची स्थापना म्हणजे केवळ पैसा गोळा करणे हा मुख्य उद्देश नसून,सामुदायिक भावना वाढीस लागावी,संघटन कौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश समोर ठेऊन मागील दहा वर्षांपासून बचत सुरू केली आहे,

थोड्याफार पैशासाठी लोकांसमोर हात पसरावे लागते,बँकांचे कर्ज मिळत नाही यातून सुटका करून घेण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे यामुळे या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते,या बाबींचा विचार करूनच बचत गटाची स्थापना करण्यात आली ,दर महिन्याला या बचत गटाची मासिक सभा होते,व सर्वांसमोर हिशोब लिहिला जातो ही बाब विशेष,,

दरवर्षी सर्व 20 सभासद एकत्र येऊन कोणता न कोणता उपक्रम राबवत असतात जसे की,जसे शेतकरी पुरुष बचत गटाची सहल,बचत गटातील सभासदांना चादर व ब्लॅंकेट चे वाटप ,मृत झालेल्या सभासदाच्या नातलगांना विशेष आर्थिक मदत व यासारखे आणखी कृती कार्यक्रम या गटातून राबवले जातात ,

श्री तुलाराम नैताम अध्यक्ष,श्री नरेंद्र पोवनवार सचिव म्हणून बचत गटाचा कारभार पाहत आहेत,तर श्री किशोर खोबरागडे,श्री कोमेश कंत्रोजवार, श्री रवींद्र कत्रोजवार ,श्री अमोल कत्रोजवार,श्री दिनकर जी धोडरे, श्री बसंतसिंग बैस,श्री अनुरथ निलेकर, श्री देवा भांडेकर,श्री मोतीराम कांकलवर, श्री वामन नैताम,दिवाकर सातेलवर,श्री वासुदेव तडसे , श्री प्रकाश दासरवार , श्री मधुकर नैताम,थामदेव महागणकार,आदी सभासद आवर्जून सभेला हजर होते,,

ही मासिक सभा श्री,संदीप कांबळे यांचे राहते घरी घेण्यात आली यावेळी गटातील सर्व सभासदांना नाश्ता व चहा ची सोय करण्यात आली,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler