पारंपरिक मातीने बनवलेली गणेशमूर्ती विक्री करीता शहरात सजला भव्य दिव्य मंडप,,

पारंपरिक  मातीने बनवलेली गणेशमूर्ती विक्री करीता शहरात सजला भव्य दिव्य मंडप,,

यावर्षी पासून गडचिरोली कर करणार पर्यावरण पूरक गणेशोत्सव,,


गडचिरोली शहर प्रतिनिधी

संदीप कांबळे 9421318021


गडचिरोली वासीयांना कुतूहलाचा ठरलेला विषय म्हणजे,मुबंई, पुणे, नागपूर सारख्या मोठया शहरात  जशी एका ठिकाणावरून गणेश मूर्ती विकल्या जातात त्याप्रमाणे गडचिरोलीत सुद्धा या वर्षीपासून  श्री,सुरेश सावकार पोरद्दीवार माजी नगराध्यक्ष गडचिरोली यांचे घरासमोरील मैदानात 3 एकर परिसरात भव्य दिव्य मंडप टाकून शहरातील कुंभार व इतर मूर्तिकार या ठिकाणा वरून मूर्तीची विक्री करणार ,जवडपास 50 स्टोल मूर्ती विकण्याकरिता सज्ज झाले आहेत, यावर्षी पीओपी ची मूर्ती बनविण्यास व ती पाण्यामध्ये विसर्जीत करण्यास बंदी असुन पीओपी च्या मूर्तीने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होते.पीओपीची गणेश मूर्ती तयार करण्यात येऊ नये असे सक्त निर्देश मूर्तिकाराना नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आले.सार्वजिनक मुर्ती ही ४ फुटाची तर घरगुती मुर्ती २ फुटा पेक्षा जास्त असु नये.

 यावर्षी पी ओ पी च्या मुर्ती विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता नगरपरिषद प्रशासन सरसावला आहे,कुणीही जर असे कृत्य करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही नगर परिषद प्रशासनाने दिला आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler