भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चपलांचा प्रहार
पालकमंत्री नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर लावलेल्या आरोपांवरुन ब्रम्हपुरीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजण कल्याण मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान व पत्र जाहीर करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चपला जोड्यांनी प्रहार करण्यात आला. तसेच काळे फासुन निषेध नोंदविण्यात आला.
ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटी, युवक काँग्रेस कमेटीच्या वतीने ब्रम्हपुरी शहरातील शिवाजी महाराज चौकात ९ सप्टेंबर रोजी सदर आंदोलन करण्यात आले.आमदार गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाप्रसंगी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोणबले, नगरसेविका निलीमाताई सावरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश बानबले, उदापुरचे सरपंच सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, प्रकाश खोब्रागडे, माजी सभापती नेताजी मेश्राम, किसान काँग्रेसचे नानाजी तुपट, माजी नगरसेवक जगदीश आमले, माजी सरपंच राजेश पारधी, चौगानचे सरपंच उमेश धोटे, वामन मिसार, नंदु गुड्डेवार, सोमेश्वर उपासे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी पारधी, मोहन बागडे, प्रमोद मोटघरे, भास्कर सोनोने, डॉ. शांताराम रामटेके, गुरुदेव वाघरे, रोशन चुधरी, रामा चिलबुले, प्रवीण राऊत, चैतन्य मेकर्तीवार, अभय बनपुरकर, चेतन बावणकुळे, गोपाल बावनकुळे, भीमराव वंजारी, दत्तात्रय टिकले, मंगला टिकले, प्रतिक नरड, प्रणय बागळे, खुशाल नागदेवते, अभय तलमले, शुभम लाडे, विक्की निमजे, ब्रम्हदेव दिघोरे, शुभम चहांदे, सचिन सुखदेवे, सुरज मेश्राम, दिपक मेश्राम, मंगल पारधी, मधुकर लडके, मिलींद खोब्रागडे, प्रितम चहांदे, शरद मैंद, रूचीत वनस्कार, प्रितम चहांदे, निखील सहारे, सचिन मेश्राम, निक्की रामटेके, गोलू रामटेके यांसह बहुसंख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

