मृतकाच्या नातेवाईकांना खा. नेते यांचेकडून आर्थिक मदतीचा आधार
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली - तालुक्यातील पाथरी येथे निसर्ग रम्य वातावरण असलेले आसोला मेंढा तलाव असून पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरलेला असतो. व्यस्त जीवनातून विसावा व आनंद घेण्यासाठी दूरदूर वरून पर्यटक या ठिकाणी येत असतात. या वर्षी सुद्धा 15 ऑगस्ट रोजी लांबून पर्यटकांची गर्दी पाथरी येथे पाहायला मिळाली परंतु कोरोनाच्या काळात या तलावावर जाण्यास बंदी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावलेला होता तरी नजर चुकवून काही नागरिक गेले असता एक अनुचित घटना घडली.
घटनेचे सविस्तर वृत्त असे कि गडचिरोली जिल्ह्यातील बाम्हणी येथील काही युवक या ठिकाणी आले असता त्यातील सोनू सोरते नामक युवक आसोला मेंढा तलावाच्या नहरात पायरीवर बसला असता अचानक तोल जाऊन पाण्यात बुडू लागला. त्याच ठिकाणी असलेला पाथरी येथील युवक सुरज नेवारे याला सोनू बुडत असल्याचे दिसताच स्वतःच्या जीवाची परवा न करता त्याला वाचविण्यासाठी नहरात उडी मारली पण सोनू सोरते ने सुरज ला पाण्यात घट्ट पकडल्यामुळे सुरज आणि सोनू दोघेही पाण्यात बुडून मरण पावले.त्यातच दुसरी घटना जीवन दुधकुळे यांच्या घरी त्यांची पत्नी बरेच दिवसाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि मृत पावली, तिसरी घटना पाथरी येथील वार्ड क्रमांक 3 मधील शामराव काटलाम यांचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. या सर्वांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती त्यामुळे पाथरी येथील उपसरपंच श्री प्रफुल तुम्मे यांनी चिमूर - गडचिरोली लोकसंभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री अशोक जी नेते यांना माहिती दिली असता आज खासदार साहेब यांनी नातेवाईकांना भेट देऊन सांत्वन केले व प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी पाच हजाराची आर्थिक मदत केली.यावेळी सावली तालुका अध्यक्ष श्री अविनाश पाल, सावली तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, पाथरी ग्रामपंचायत चे सरपंच सौं अनिता ठिकारे, उपसरपंच श्री प्रफुल तुम्मे, पंचायत समिती माजी उपसभापती श्री तुकाराम ठिकरे, विनोद धोटे, विशाल करंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाघमारे, अल्का वागधरे, मिलिंद ठीकरे, प्रीती लाडे तथा युवा कार्यकर्ता शरद सोनवाने,हरी भोयर, अशोक वरखडे आदी उपस्थित होते.

