भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने सुधाताई सेता यांना श्रद्धांजली अर्पण,,,,

 भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने सुधाताई सेता यांना श्रद्धांजली अर्पण,,,,


गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




     डॉ.सुधा सेता या महिला पतंजली योग समिती,जिल्हा स्काउट-गाईड चळवळ,लायन्स क्लब तसेच अनेक सामाजिक संघटनेमध्ये सक्रीय कार्यकर्त्या होत्या.स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान महाविद्यालयामध्ये सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. विविध सामाजिक संघटनेमध्ये केलेले कार्य हे कौतुकास्पद होते.असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सुधा सेता यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना केले.

  स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्राम भवनामध्ये आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने स्व,सुधाताई सेता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. योगीताताई भांडेकर यांनी सुधाताई सेता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

  यावेळी सौ.योगीताताई भांडेकर,प्रतिभाताई चौधरी,वैष्णवीताई नैताम,लताताई लाटकर,निताताई उंदिरवाडे,ज्योतीताई बागळे,निलीमाताई राउत,पुनम हेमके,उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler