मेंडकी येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती निमित्त महर्षी वाल्मिकी चावडी चे लोकार्पण संपन्न
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे ९७६५८७४११५
आज दि.२०.१०.२०२१ रोजी तालुक्यातील मेंडकी येथे महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती चे औचित्य साधून १५वा वित्त आयोग (प.स.स्तर) सन २०२०-२१ अंतर्गत बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी चावडी चे लोकार्पण मा.थानेश्वर पाटील कायरकर सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी यांचे अध्यक्षतेखाली lसौ.मंगलाताई ईरपाते सरपंच ग्रामपंचायत मेंडकी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर मेंडकी ग्रामपंचायत माजी सरपंचा तथा ब्रम्हपूरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. मंगलाताई लोनबले, मेंडकी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती नयनाताई गुरनुले ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर, ग्रामपंचायत सदस्य चिंताराम जेल्लेवार, ग्रामपंचायत सदस्या सौ कुंदाताई कोरेवार ग्रामपंचायत सदस्या सौ विद्याताई चौधरी, सुधाकर महाडोरे, भोईसमाज अध्यक्ष रमेश मारभते, मच्छीमार सहकारी संस्था माजी सचिव रामाजी ठाकरे, शामराव वैरकार, माजी अध्यक्ष महारु दुमाने, पांडुरंग वैरकार,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामाजी वैरकार यांनी केले.सुत्रसंचालन आणि आभार बाजीराव मारभते, यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्येने भोईसमाज बांधव उपस्थित होते.