शेतात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा तालुक्यातील कोटबाळा शेतशिवारात आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान शेतकरी हेमंत भास्कर उरकांडे वय 42 वर्ष रा.कोटबाळा हा शेतात काम करिता असताना अचानक वीज पडल्याने त्याच्या जागेवरच मृत्यू झाला. त्याना पत्नी मुलगा माणस वय 15 आई आहे. सायंकाळ होऊनही हेमंत घरी आला नाही त्यामुळे त्याचा तपास घेण्यास शेतात गेले असता तो शेतात मृत आढळला. त्यानंतर शेगाव पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिली. घटनास्थळी शेगाव पोलीस येऊन त्यांनी पंचनामा करून शवविच्छेदना करीत उपजिल्हा रुग्णालयात येथे पाठवले घरचा एकुलता एक करता पुरुष गेल्याने उरकांडे परिवार वारावर आभाळ कोसळलेले आहे
